साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून तरुण बेरोजगारीच्या सावटाखाली असतांना अनेक शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती सुरु झाल्यानंतर आता सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचे समजते. यावर आज उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, कंत्राटी भरती संदर्भात आमच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे पाप काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील असून याचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही यांच्या चेहऱ्यावरील बुरखा आता फाडला असून आमच्या सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाच कंत्राटी पद्धतीने भरतीचा पहिला निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये पहिल्यांदाच या संदर्भातचा जीआर काढण्यात आला, असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. सर्वात आधी शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण यांच्या नंतरच्या काळाज पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भातला जीआर काढण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.