ऐनपूर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रावेर ; – सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील करिअर मार्गदर्शन केंद्रा अंतर्गत उच्च शिक्षणातील वाटा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भुषविले.

- Advertisement -

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दिपाली वाय. किरंगे (के.सी. ई चे व्यवस्थापन व संशोधन संस्था जळगाव) यांनी पदवीनंतर उच्चं शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध कोर्सेस की ज्यामध्ये आपल्याला मध्ये करिअर करता येते याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक डॉ.संदीप घोडके (के.सी. ई चे व्यवस्थापन व संशोधन संस्था जळगाव) यांनी पदवीनंतर उच्चं शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध कोर्सेसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षा बद्दल माहिती देताना प्रवेश अर्ज कसा भरावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले. या कार्यक्रमाला तृतीय वर्ष कला व विज्ञान शाखेचे एकूण ५६ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपत प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना परंपरागत शिक्षणाचा मागे न धावता नवीन कोर्सेस निवडून आपले करिअर घडवता येईल असेल सांगितले. शेवटी करिअर मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.व्ही.एन.रामटेके यांनी मान्यवरांचे आभार मानले व शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS