एसडी सीड तर्फे करियर मार्गदर्शन संपन्न ; जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) : – जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्यध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या दूरदृष्टी आणि अमूल्य मार्गदर्शनातून अविरतपणे सुरु आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडता यावे त्यांच्यातील बलस्थाने, कमतरता, कौशल्य आणि त्यांची आवड लक्षात घेऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल याविषयी त्यांना मागदर्शन मिळावे या उद्देशाने सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या वतीने महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे एसडी सीड सल्लागार समिती सदस्य प्रा. एस. व्ही. सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात “करिअर मार्गदर्शन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

करिअरची दिशा हि दहावीनंतरच ठरविली पाहिजे. आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्वाचे मानले जाते. करिअरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. आज करिअरची अनेक क्षेत्रे तरुणांसाठी खुली आहेत. मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना दहावी नंतर उपलब्ध विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली.

- Advertisement -

प्रा. सोमवंशी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
+ स्वतःला ओळखा
+ तुमच्यातील बलस्थाने, कमतरता, कौशल्य आवड यांची सुयोग्य जाणीव असू द्या
+ स्वतःची आवड असलेल्या क्षेत्रात उत्तम करिअर संधी असते.
+ करिअर समुपदेशन व सल्ला घ्या
+ पालकांशी सुयोग्य संवाद साधा
+ कोणत्या विषयात करिअर करायचे आहे ते आधी समजून घ्या
+ इंटरनेट, फेस बुक whatsapp यांचा करिअर विषयी माहिती मिळविण्यासाठी वापर करा

सदर कार्यशाळेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. बी. सोनवणे, पर्यवेक्षक श्री. सी.एच. चौधरी, श्री .एस. डी. पाटील, एस. व्ही. पाटील, सौ. समिधा हनी, श्री. ऋषिकेश पाटील व एसडी-सीड समन्वयक प्रविण सोनवणे तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. बी. सोनवणे आणि विद्यालयांच्या व्यस्थापनाबद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS