CCTV Camera ; जाफ्राबाद शहरात चौका-चौकात CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

“युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांची जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीजाफ्राबाद ; – तालुक्यात चोरीच्या घटना या वाढत असल्याने शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसून चोरी व अवैध वाळू वाहतुक थांबवण्यासाठी प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री प्रमोद पाटील फदाट यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

- Advertisement -

जाफ्राबाद शहरांच्या हद्दीतील प्रमुख चौकात प्रामुख्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक,अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महाराणा प्रतापसिंह चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन शेतकरी बांधवांच्या होणारे शेतमाल चोरी,तसेच तालुक्यातील पुर्णा,धामना,केळणा या नदीपात्रातील वाळुचे अवैध चोरट्या मार्गाने उत्खनन करुन वाहतूक सर्रासपणे चालु आहे. शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून महसुलाची चोरी, रेती तस्कर करित आहेत. मौजे माहोरा ग्रामपंचायत या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक आहेत. कारण या ठिकाणावरून विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक नेहमी होत आहेत त्यामुळे शासनाच्या महसुलाच्या चोरी शोधणे पोलिस प्रशासनाला सोपे होईल तरी सिसिटिव्हि कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक असल्याने CCTV कॅमेरे लावल्यास कारवाई करण्यास मदत होईल. असे युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद पाटील फदाट यांनी निवेदनात म्हटले आहे..

CCTV Camera

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS