जळगाव ; – शहरात आठवड्यात एक खूनाची घटना ताजी असतांना आज सार्वजनिक बांधकाम विभागात आज दुपारी दोन गटात काही कारणामुळे चजणगले चा भांडण झाले आणि या भांडणाची दिवसभर चांगलीच चारचा रंगली होती . या घटनेमुळे बांधकाम विभागात दिवसभर शांतता होती . प्रत्येक ऑफिसात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची हे आवश्यक आहे . मात्र बांधकाम विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाही . आणि आज झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जळगाव बांधकाम विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि आज शहरातील CCTV Camera Jalgaon Construction Department बांधकाम विभागात दोन घाटात जोरदार वाद झाला आणि या वादात चक्क एका गटाने तालावर आणि करत काढल्याची चर्चा होती . मात्र याबाबत कुठेही तक्रार करण्यात आली नाही , बांधकाम विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी आज दीपककुमार गुप्ता यांनी आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्य अभियंता महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक, जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आज दि.12 डिसेंबर रोजी वेळ भरदिवसा 12.30 सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय समोरील जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयमध्ये दोन गटात बाचाबाची झाली व त्या दोघी गटाने एकमेकावर तलवारी काढल्या अशी चर्चा आहे .
यापूर्वीहि झाली होती अशी घटना .
आज झालेल्या या घटनेचे अनेक लोक साक्षीदार आहेत. परंतु ज्यांनी हि घटना पाहिली ते लोक घाबरलेले असून कोणीही तक्रार देणेसाठी पुढे येत नाही व तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ही घटना कुठेही नोंद झालेली नाही. परंतु हे कायदा व सुव्यवस्थाचे दृष्टीने अत्यंत घातक व चुकीचे आहे. जर का या अशा प्रकाराला आळा बसला नाही तर येणाऱ्या काळात मोठी घटनेची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून या ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण कार्यालयमध्ये लावण्यात यावे व आज घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावे, असेही म्हटले आहे.