दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेणारा सण. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. समाजातील सर्व स्थरांत दिवाळी हा मंगलमय, आनंददायी आणि मनामनात नवं चैतन्य निर्मण करणारा सण आप-आपल्या परीनं का होईना जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, तो प्रत्येकाच्यांच वाट्याला येतो असं नाही देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि वंचित घटकांचीही दिवाळी गोड व्हावी.याच भावनेतून शेतकरी पुत्र हर्षल पाटील फदाट यांनी “आपुलकीची दिवाळी” उपक्रम हाती घेत, वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला.
दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमीच अंधार असतो.
शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या, गोरगरीब दैनंदिन जीवन जगत असतांना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. शिवाय इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणं यासारखं दुसरं सुख नाही. हर्षल पाटील फदाट(सामाजिक कार्यकर्ते)यांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजुंना फराळ, मिठाईचे वाटप केले. गरिबांच्या जीवनात प्रकाशमान करण्याचा छोटासा प्रयत्न केला.याच उद्देशानं हर्षल पाटील फदाट यांनी हाती घेतलेला “आपुलकीची दिवाळी” उपक्रम गेली तीन वर्षे हा उपक्रम राबवीत आहे.