chalisgaon nagarparishad | निकालाआधीच विजयाचा जल्लोष! चाळीसगावात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

चाळीसगाव (sakshidar news) — नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच चाळीसगाव शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचा दावा करत शहरात ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.

- Advertisement -

शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. “लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा” असा आशय असलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अधिकृत निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच अशा प्रकारे विजयाचा जल्लोष झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचल्याचे वातावरणातून स्पष्ट होते. काही नागरिकांनी मात्र निकालापूर्वीच विजय जाहीर केल्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, निवडणूक प्रशासनाकडून निकालाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या चाळीसगावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Ration Card | जानेवारी 2026 पासून रेशनमध्ये मोठा बदल! अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार ? वाचा सविस्तर
rohit pawar firing | थरारक घटना! रोहित पवारवर हॉटेलमध्ये गोळीबार, एक आरोपी ताब्यात
Anti Corruption Bureau | रावेर तालुक्यात एसीबीचा सापळा; चोरवाड नाक्यावर स्टेट एक्साईज अधिकाऱ्यावर कारवाई

 

chalisgaon nagarparishad

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS