Election ; या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Election महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव (साक्षीदार न्युज ):- मागील दहा वर्षात आपल्याला फक्त खोटी आश्वासने आणि जुमलेबाजीच्या पलीकडे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जनता त्रस्त झालेली असून त्यांच्या मनात या सरकारविषयी प्रचंड राग दिसून येत आहे. त्यामुळे जनतेने ठरवलंय की यंदा जळगावात परिवर्तन आणायचं. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

महाविकास आघाडीची प्रचार सभा बुधवार, दि.१ रोजी शहरातील तांबापुरा येथे पार पाडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी, शहराध्यक्ष आसिफ शेख, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, ॲड.ललिता पाटील, मजहर पठाण, माजी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे, नगरसेवक सादिक खाटीक, आम आदमी पार्टीच्या शहरप्रमुख अमृता नेरकर, सरिता नेरकर, माजी नगरसेविका पार्वताताई भिल यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, ही निवडणूक लोकशाही आणि देश वाचविण्यासाठी आहे. आपल्याला आपला देश आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क अतिशय विचारपूर्वक आणि प्रभावीपणे वाजवावे लागेल, असे सांगून येणाऱ्या १३ तारखेला अनुक्रमणिका क्रमांक १ वरील ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

- Advertisement -

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी आदींनी मनोगत व्यक्त करून १३ तारखेला मशाल चिन्हाला मतदान करून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Election

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS