Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar | चर्मकार समाजातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

बाबासाहेबांचे विविध गुण आत्मसात करुन समाजाचा सर्वांगीण विकास करावा:सेवानिवृत्त मुख्य.अभियंता मान.श्री.राजेंद्र बावस्कर यांचे आवाहन

- Advertisement -

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar साक्षीदार न्युज । जळगांव येथील 257, भास्कर मार्केट या ठिकाणी सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच मोठ्या संखेने उपस्थित समाजबांधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक बाळकृष्ण खिरोडे यांनी केले तर महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपण प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर,समाज भूषण पुरस्कार प्राप्त वसंतराव नेटके,चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य .विश्वनाथ सावकारे,संजय वानखेडे सर,काशिनाथ इंगळे,बाळकृष्ण खिरोडे,अँड.अर्जुन भारुळे,लिलाधर भारुळे ,संजय बावस्कर,दिलीप दांडगे,कमलाकर ठोसर,यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी राजेंद्र बावस्कर वसंतराव नेटके,संजय वानखेडे सर यांनी मनोगत व्यक्त करून विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध शैक्षणिक,सामाजिक,राजकीय ,कृषिविषयक कार्याची माहिती सांगून समाजबांधवांनी डॉ.बाबासाहेबांचे विविध गुण आत्मसात करुन समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले.या वेळेस नामदेव चिमकर,श्री. डी.जी.भारुळे,शिवदास कळसकर,प्रा.रवींद्र नेटके,पंकज तायडे,यशवंत सावकारे,रघुनाथ डोळे,सुभाष वडनेरे,भास्कर ठोसर,रामा सोनवणे,अशोक साळी,प्रवीण चौधरी,वीरेंद्रकुमार पाटील,आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वानखेडे सर यांनी तर आभारप्रदर्शन काशिनाथ इंगळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण चौधरी,काशिनाथ इंगळे,संजय वानखेडे व चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS