Charmkar Vikas Sangh | साक्षीदार न्यूज | जळगाव येथील चर्मकार विकास संघ आणि गुरु रविदास क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै 2025 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. संजयजी खामकर यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या उत्साही पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती जाहीर केली. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
नव नियुक्त पदाधिकारी
या कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली:
-
श्री. प्रकाश रोजतकर साहेब: अध्यक्ष,सल्लागार समिती
- Advertisement - -
श्री. विश्वनाथभाऊ सावकारे: प्रदेश उपाध्यक्ष
-
डॉ. श्री. संजय भटकर: राज्य संघटक
-
श्री. संजय वानखेडे सर: राज्य कार्यकारिणी सदस्य
-
ॲड. श्री. चेतनभाऊ तायडे: राज्य सहसचिव
-
प्रा सौ. स्मिताताई जयकर: महिला जिल्हा अध्यक्ष
-
प्रा. सौ. उषाताई दांडगे: महिला शहर अध्यक्ष
-
सौ. योगिताताई वानखेडे: रावेर तालुका अध्यक्ष
-
श्रीमती लताताई सावकारे: मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष
-
श्री. सुधाकर मोरे सर: जिल्हा कार्यकारिणी सदस्य
-
प्रा. श्री. अशोकराव चित्ते: जिल्हा कार्यकारिणी सदस्य
-
श्री. रिझायनर घुले: जिल्हा कार्यकारिणी सदस्य
-
श्री. संजय छगन वाघ: जिल्हा कार्यकारिणी सदस्य
-
डॉ. श्री. कडू पोपट भोळे: सल्लागार समिती सदस्य
-
श्री चावदस सपकाळे: सल्लागार समिती सदस्य
-
श्री. शिवदास कळसकर: सचिव,जळगाव महानगर
-
श्री. सुरेश अहिरे सर: जिल्हा संघटक
-
सौ. उज्वला वाडेकर मॅडम: जिल्हा सचिव,महिला आघाडी
अभिनंदन आणि शुभेच्छा
प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी खामकर यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. या नव्या जबाबदाऱ्या पार पाडताना समाजसेवेच्या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि शुभकामना देण्यात आल्या. या नियुक्त्या चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी आणि सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.