Revenue Samadhan Camp यावल |मिलिंद जंजाळे | महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” बामणोद मंडळ अंतर्गत आमोदे (ता. यावल) येथे शनिवार दि. 7 मार्च रोजी उत्साहात पार पडले. या शिबिराद्वारे विविध शासकीय सेवा आणि योजनांचे लाभ नागरिकांना थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी विजय ढगे (महसूल, जळगाव) आणि तहसीलदार मोहनमाला नाझिरकर (यावल) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, तालुका स्तरीय कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरातील प्रमुख लाभ
या समाधान शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
पुरवठा शाखा 142 नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वितरण
संगायो शाखा 327 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 99 हयात प्रमाणपत्रे, 12 नवीन अर्ज
सेतु शाखा : 242 उत्पन्न दाखले, 71 राष्ट्रीयत्व दाखले, 69 रहिवासी दाखले, 26 जातीचे दाखले,21 आधार नोंदणी,55 आधार दुरुस्त्या
पंचायत समिती 2 जलतारा योजनांना प्रशासकीय मान्यता
बालविकास विभाग 6 लाभार्थ्यांना बेबी किट वाटप
तालुका आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना – 8 लाभार्थी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – 4 लाभार्थी, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – 11 लाभार्थी
संजय गांधी योजना 46 लाभार्थ्यांना मदत
कृषी विभाग फळबाग लागवड योजनेत 2 लाभार्थी
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना 1 लाभार्थी
माहिती व मार्गदर्शन स्टॉल
शिबिराच्या ठिकाणी विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली आणि त्यांना तात्काळ अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
या शिबिराला सुमारे 500 ते 600 नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्याचा उद्देश यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजय ढगे आणि तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई (मंडळ अधिकारी, बामणोद) यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अतुल गांगुर्डे (नायब तहसीलदार) यांनी मानले.








