Chief Minister Shinde ; साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | राज्याचे राजकारण भाजप व ठाकरे गटात तापले असतांना मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भल्या पहाटेच मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पाच वाजताच रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल ऑन द स्पॉट घेत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालवली होती. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठक घेण्यात आल्या. विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याचे कामे सुरु झाली आहेत. याच कामांची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रदूषणावर नियंत्रण करण्याचे काम केले जात आहेत. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. तर एक दिवसाआड मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले जाईल असेही ते म्हणाले.