मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलाच्या मामाला बेदम मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

धरणगाव ; – तालुक्यातील चमगाव येथे मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलाच्या मामाला त्याच्या घरात घुसून पाच जणांनी बेदम मारहाण केली तर जीवेठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव चैत्राम यशवंत पाटील वय-४४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चैत्राम यांच्या भाच्याने एका मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून गावात राहणाऱ्या पाच जणांनी त्यांना घरात घुसून शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केली. ही घटना शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गावात घडली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता चैत्राम पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Uncle Girl

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS