Chopda Fake Htbt Cotton Seeds | चोपडा: 18 लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त, एकावर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Chopda Fake Htbt Cotton Seeds साक्षीदार न्युज । विश्वास वाढे चोपडा | जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावात जिल्हा आणि स्थानिक कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 17 लाख 82 हजार 200 रुपये किमतीच्या 1273 बियाणे पाकिटांचा समावेश आहे. याप्रकरणी संशयित नितीन नंदलाल चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चुंचाळे-अकुलखेडा रोडवरील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. या पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील तसेच पोलीस कर्मचारी विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे आणि समा तडवी यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि कावेरी कमलाकर यांनीही कारवाईत सहभाग घेतला.

जप्त केलेले बियाणे हे कायदेशीररित्या प्रतिबंधित एचटीबीटी प्रकारचे असल्याचे आढळले. या प्रकरणी नितीन चौधरी याच्यावर बियाणे कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देताना म्हटले आहे की, अशा बोगस बियाणांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असेही विभागाने स्पष्ट केले.

भारताची कडक भूमिका: अटारी तपासणी चौकी बंद, पाकिस्तानी व्हिसा रद्द, 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरेंचा निषेध: केंद्राने कठोर कारवाई करावी, मनसे सरकारसोबत
धरणगावात बदला प्रकरणात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर

स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय; नयनतारा मॉलवर पोलिसांचा छापा, ४ महिलांची सुटका

वर्षाला फक्त २० रुपये खर्च, मिळेल २ लाखांचे संरक्षण; जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ योजना
आरबीआयचा नवीन निर्णय: 10 वर्षांवरील मुलांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याची परवानगी

Chopda Fake Htbt Cotton Seeds

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS