साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील श्याम नगर परिसरात दि. १२ नोव्हेबर रोजी घरात कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करीत असताना घरासमोर चार जणांनी येऊन शिवीगाळ करण्यासह दोन भावंडांना तसेच त्यांच्या वडिलांना मारहाण केली. यातील एक भाऊ लखन जगदीश ढोले ( वय २१) याच्यावर चॉपरने वार करून जखमी केले. या प्रकरणी १३ रोजी रामानंदनगर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्यामनगरमधील रहिवासी ढोले कुटुंबीय रविवारी रात्री घरात जेवण करीत असताना शेजारील एका जणासह चार जण आले व त्यांनी शिवीगाळ केली. या विषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी जगदीश ढोले, त्यांचा मोठा मुलगा लखन ढोले व लहान मुलगा प्रेम ढोले (१८) यांना मारहाण करीत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यातील एका जणाने चॉपरने लखनच्या डोळ्याच्या वर व खाली वार केला. या प्रकरणी जखमी तरुणाच्या आई मीना ढोले यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.