MLA Festival जळगाव (साक्षीदार न्युज) ; – शहराला आधीपासूनच सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे ही परंपरा कायम रहावी व आपल्या जळगांवातील सांस्कृतिकतेला अधिकाधिक गती मिळावी यासाठी जळगाव शहरात येत्या २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा ) यांनी “आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून १८ ऑगस्ट रोजी या महोत्सवाची सागर पार्क येथे झालेल्या लेझिम व ढोल पथक महोत्सवाने दणक्यात सुरवात झाली.
👉🏽 जळगावात देश सोडण्याच्या का दिल्या नोटीस
आता २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे पार पडणार आहे. यात समूह लोकनृत्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, समूह देशभक्तीपर गीत स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तसेच महिलांसाठी खास साडी वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा या अश्या विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी जळगाव शहरातील प्रेक्षकांना अनुभवायाला मिळणार असून अनेक कलाकारांच्या कलागुणांना भव्य असे व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी केले आहे.