back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

MLA Mangesh Chavan ; शहर वासीयांची अनेकांनी केली फसवणूक , माझा मात्र प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढायचा माझा संकल्प – आमदार मंगेश चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MLA Mangesh Chavan ; शहरातील तितूर नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न,

- Advertisement -

मुख्य रस्त्यांची कामे सुरु असल्याने पुढील काही दिवस फक्त तीनचाकी रिक्षा, दुचाकी व पादचारी यांच्यासाठी खुला राहणार पूल

लोकार्पणाला १५ दिवस उशीर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी

- Advertisement -

MLA Mangesh Chavan

MLA Mangesh Chavan ; चाळीसगाव (साक्षीदार न्युज ) ; – जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असणाऱ्या चाळीसगाव शहराची गेल्या काही दशकांपासून विकासाएवजी भकासपणा कडे वाटचाल होत होती, शहरवासीयांनी मोठ्या विश्वासाने अनेकांना ३५ वर्ष नगरपालिकेत एकहाती सत्ता दिली, केंद्रात राज्यात स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना आमदारकी खासदारकी दिली. मात्र त्यांनी शहराला काय दिले ? साधा एक उंच पूल उभारता आला नाही. घरासमोरचे रस्ते मोठे करता आले नाहीत. नदी सुशोभिकरण नावाखाली नदीत अतिक्रमण करून विद्रूप केली, मुंबई सी लिंक च्या धर्तीवर पूल उभारू सांगितला ते थडगे आता कपडे सुकवण्यासाठी वापरत आहेत. एकप्रकारे यांनी त्यांना जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला, शहरवासीयांची फसवणूक केली आहे, मात्र मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा सुरुवातीचे अडीच वर्ष विरोधी पक्षाचे सरकार होते. २०२१ मध्ये या तितूर नदीला एका वर्षात ७ वेळा महापुर आला, जुन्या पुलाखालून पाणी पास होत नसल्याने तसेच नदीमधील अतिक्रमणामुळे पुराचेशहरवासीयांच्या घरात, दुकानात घुसले, संसार उघड्यावर आले. माझ्यासाठी हे सर्व दृश्य वेदनादायी होते. त्यावेळीच ठरवले कि कुठल्याही परिस्थितीत तितूर नदीवरील हा जुना पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारायचा आणि आज रेकॉर्डब्रेक अश्या ११५ दिवसांच्या वेळेत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी खुला होत आहे. जनतेने संधी दिली म्हणून माझ्याहातून हे विकासकाम उभे राहू शकले त्यामुळे हे विकासकाम नम्रपणे सर्व चाळीसगाववासीयांना अर्पण करतो अशी भावना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

MLA Mangesh Chavan

ते चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील नवीन पुलाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. पुलाचे लोकार्पण जरी झाले असले तरी या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणं सुरू असल्याने कामाला व रहदारी ला अडथळा होऊ नये म्हणून मोठ्या वाहनांना १५ ऑगस्ट पर्यंत पुलावर प्रवेश नसणार आहे. त्यामुळे आता पुलावरून तीनचाकी रिक्षा, दुचाकी मोटारसायकल व पादचारी यांना वापर सुरू राहील.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मच्छिंद्र राठोड, माजी नगराध्यक्ष डी.आर. चौधरी, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, जेष्ठ नेते उद्धवराव महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपअभियंता अनिल बैसाने, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ताई ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, घृष्णेश्वर पाटील, संगीताताई गवळी, एड. सुलभा पवार, वैशाली राजपूत, संजय रतनसिंग पाटील, आनंद खरात, संजय भास्करराव पाटील, ए.ओ. पाटील सर, कपिल पाटील, धनंजय मांडोळे, बाबूलाल पवार गुरुजी, प्रशांत देशमुख, किशोर पाटील, विवेक चौधरी, प्रभाकर चौधरी, रामचंद्र जाधव, अमोल नानकर, अमोल चौधरी, गुरुजी अनिल बैसाणे प्रशांत पालवी बापू अहिरे अजय वाणी, संभाप्पा घुले, साहेबराव राठोड, शैलेंद्र पाटील, सुनील जमादार, राहुल पाटील, किशोर पाटील, निलेश वाणी, प्रदीप पाटील, विनोद घुमरे, मानसिंग राजपूत, बाबा पवार, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, विजय जाधव, अल्लाउद्दीन दादा, अगगा सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

१०० दिवसांचे टार्गेट, मात्र १५ दिवस लोकार्पणाला उशीर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी

हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल हा जुन्या राष्ट्रीय महामार्ग २११ वरील शहरात सर्वात महत्वाचा रस्त्यावर असल्याने हा मार्ग बंद झाला तर शहर वासीयांची तसेच बाजारात जाणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार होती. त्यामुळे मार्च २०२४ मध्ये टेंडर प्रकाशित झाल्याल्यानंतर पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर म्हणजे १०० दिवसांच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला मात्र काम सुरु झाल्यानंतर नागरिकांनी पुलाची उंची अजून वाढवावी अशी मागणी केली त्यामुळे नवीन परवानगी घेण्यास अजून २० दिवस उशीर झाला. त्यामुळे पुलाच्या कामाला उशीर झाला मात्र यावर देखील काहींनी राजकारण केलं. काहींनी तर अजून १ वर्ष पुलाचे काम पूर्ण होणार नाही असे आखाडे बांधले मात्र कंत्राटदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले, मी त्यांचे देखील आभार मानतो तसेच लोकार्पणाला १५ दिवस उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

पुलावर दोन्ही बाजूला आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून आकर्षक रंगांचे पथदिवे बसविण्यात आले आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलाची शोभा अजूनच वाढणार असून हा पूल शहरवासीयांचे एक आकर्षणाचे केंद्र बनणार आहे

नाशिक मधील बस दरीत कोसळली लाईव्ह व्हिडिओ

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS