Devi Visarjan | खेडी कढोली गावात मिरवणुकी दरम्यान दोन गटात हाणामारी दहा ते बारा जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Devi Visarjan | एरंडोल । साक्षीदार न्यूज । तालुक्यातील खेडी कढोली येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान धक्काबुक्कीच्या क्षुल्लक कारणावरून आणि जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांतील एकूण १३ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागल्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. या वादाचे पर्यवसान काही वेळातच तुफान हाणामारीत झाले, ज्यात दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यामागे जुना वाद असल्याचेही म्हटले जात आहे.

रुग्णालयातही पुन्हा तणाव
या हाणामारीत जखमी झालेल्या सर्वांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातही दोन्ही गट पुन्हा एकदा आमनेसामने आले, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे खेडी कढोली गावात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दोन्ही गटातील एकूण १३ जण जखमी
प्रकाश सिताराम सोनवणे वय २७, सोनान नारायण सोनवणे वय २०, संदीप सिताराम सोनवणे वय ३०, ऋषिकेश विठ्ठल सोनवणे वय ३०, संतोष ऋषिदास सोनवणे वय २०, पुरुषोत्तम मोहन सोनवणे वय ३०, किरण युवराज सोनवणे वय ४०, नितीन अरुण सोनवणे वय २८, अरुण लहू सोनवणे वय ४९, मंगलाबाई सुरेश सोनवणे वय ५७, युवराज लहू सोनवणे वय ६०, दुर्गेश एकनाथ सोनवणे वय ३२, राहुल मोहन सोनवणे वय ३५ हे गंभीर जखमी झाले आहेत.

Devi Visarjan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS