अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प़ाण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे यांनी देशातील, राज्यातील मंदिरे स्वच्छता, साफसफाई चे जनतेला आव्हान केले होते.
DAY 2 : श्री राम कथा जळगांव शिवतीर्थ मैदान – प्रत्येक राम भक्ताने आपले हक्काच चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा
येथे क्लिक करा
आज रविवार रोजी २१ जानेवारी रोजी जळगाव शहरात प्लाॅगर ग़ुप (८६ वे स्वच्छता अभियान) आणि लाॅयन्स क्लब सेंट्रल जळगाव तर्फे बस स्थानका समोरील चिमुकले राम मंदिर, विसनजी नगरातील गायत्री मंदिर, बळीराम पेठेतील रेल्वे लाईन लगत असलेले साई मंदिर येथे वरील अभियान राबविण्यात आले.

सर्व प्रथम सकाळी ६.३० ला चिमुकले राम मंदिरात प्लाॅगर ग़ुप यांनी मंदिर परिसरातील परीसर साफसफाई करण्यात आली त्यात पाला पाचोळा, प्लास्टिक वेस्ट बाटली आणि दिवे उचलून परिसर स्वच्छ केला. या प़संगी चिमुकले राम मंदिराचे आदरणीय श्री दादा जोशी आणि मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर येथील वातावरण आनंदमय झाला.
विसनजी नगरातील गायत्री मंदिरातील परिसर येथे स्वच्छ अभियान साफसफाई करण्यात आली.
याप़संगी लाॅयन्स क्लब सेंट्रल जळगाव चे प़ेसिडेंट श्री निलेश संघवी आणि खजिनदार श्री नितीन मंडोरा, सचिन जाखेटे आणि पदाधिकारी श्री भगवती प़साद मुंदडा, माजी नगरसेवक श्री अनिल झंवर, मंदिराचे पदाधिकारी आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन चे प़तिनिधी मदन रामनाथ लाठी आदि उपस्थित होते.बळीराम पेठेतील रेल्वे लाईन लगत असलेले श्री साई बाबा मंदिर जाग़ुत स्थान असलेले मंदिरात लाॅयन्स क्लब सेंट्रल जळगाव यांच्या सौजन्याने वरील अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे पुजारी, वरील दोघे संस्थांचे पदाधिकारी यांनी केले.








