back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर ठेवला आणि विश्वास शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (सुनिल भोळे ) : – शहरातील आ.राजूमामा भोळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील सुप्रीम कॉलनी येथील वार्ड क्रमांक १९, मंडळ क्रमांक ३ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. भोळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आगामी काळात महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असे या युवकांनी सांगितले.

- Advertisement -

Bharatiya Janata Party

देशात व राज्यात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील भारत आणि प्रगतिशील महाराष्ट्र निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण व नागरिक हे पक्षात प्रवेश करीत आहे. त्यानुसार शहरातील वार्ड क्रमांक १९ येथील सुप्रीम कॉलनीतील १०० पेक्षा अधिक तरुणांनी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

- Advertisement -

यावेळी आ. भोळे यांनी पक्षाचा गमछा गळ्यात टाकून तरुणांचे स्वागत केले. प्रसंगी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विठ्ठल पाटील, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप बोरोटे, किसन मराठे, लखन वंजारी, प्रकाश वंजारी आदी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाजाच्या तरुणांचा समावेश होता.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS