सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रम

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे ) : – भारताचे प्रथम गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आ. राजूमामा भोळे यांनी मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती जळगावच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या इमारतीखाली सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रशस्त पुतळा उभारण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आ. राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला वंदन केले.

- Advertisement -

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अतुलनीय असून देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले. लोहपुरुष सरदार पटेल यांचे कार्य व विचारांपासून समाज बांधवांनी प्रेरणा घेत मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे असे आमदार भोळे म्हणाले.

यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, डॉ. वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, कुंदन काळे, अजित राणे, सुनील महाजन, पियुष कोल्हे, चंदन कोल्हे, शंतनु नारखेडे, मिलिंद चौधरी, ललित चौधरी, महेश चौधरी यांच्यासह समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS