यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील एका गावातील स्वस्त धान्य दुकाना विषयी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज देऊन ही अद्याप पर्यंत चौकशी का केली नाही या कारणावरून एकाने दारूच्या नशेत घातला कार्यालयात धिगांणा पोलिसात गुन्हा दाखल .
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती वरून यावलच्या तहसील कार्यालयात शुक्रवारी दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान तालुक्यातील सौखेडासीम येथील सुनील नथू भालेराव यांनी यावल येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे गोदाम व्यवस्थापक वाय. डी.पाटील यांना दारूचे नशेत शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला, यावेळी तहसील कार्यालयात यावल तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक असल्याने व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दारूड्या व्यक्तिने घातलेला गोंधळ बघण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती .
याबाबतची तक्रार गोदाम व्यवस्थापक वाय डी पाटील यांनी येथील पोलीस ठाण्यात दिल्यावरून सुनील भालेराव यांचे विरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .