दोन्ही भावात सतत वाद ; थोरल्या भावाने केला खून !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | दिवाळीचा उत्साह सुरु असतांना अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे घडली आहे. दोन्ही भावांमध्ये घरगुती वाद होता. या वादातून सख्ख्या मोठ्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सावरी/मुरमाडी येथे राहणारे भोयर कुटुंबातील भाऊंमध्ये वाद उद्भवला होता. हा वाद विकोपाला पोहचला होता. भावांमधील सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला. खेडेपार रोडजवळ लहान भावाची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १३ नोव्हेम्बरच्या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

आकाश रामचंद्र भोयर (३१ वर्षे, रा. सावरी/मुरमाडी ता.लाखनी) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात राहुल रामचंद्र भोयर (३३ वर्षे रा.सावरी,ता. लाखनी) व मारोती न्यायमूर्ती (वय अंदाजे २८, रा.नागपूर) असे आरोपींचे नावे आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तपस करत अवघ्या १५ तासात आरोपीला नागपूर येथून अटककेली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS