यावल ; – तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात दि. 26/रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास जनता एज्युकेशन सोसायटी,दहिगांवचे जेष्ठ संचालक राजाराम सेनू महाजन यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन मुख्याध्यापक .पी.बी.पाटील यांनी केले. उपस्थित सर्वांनी सामुदायिक प्रास्ताविका वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व फलक लेखन अजय पाटील यांनी केले. त्या प्रसंगी पर्यवेक्षक श्री. आर.पी.साळुंके, शिक्षक प्रतिनिधी .डी.जे.ठाकरे, एम.आर. महाजन, व्ही.बी.पाटील, सौ. प्रतिभा पाटील, डी.आर.महाजन,.आर.आर.चौधरी, .पी.एच.बादशाव, एन. डी.पाटील, .एस.आर.चौधरी, गणेश पाटील, एन.पी.चव्हाण, मधुकर पाटील, .हरिश्चंद्र महाजन इ. शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.