back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Constitution lite cycle rally ; संविधान साक्षर सायकल रॅली युवकांना प्रेरणा देणार : जयसिंग वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव :- सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील ( वकील ) यांनी १३ ते २६ नोव्हेबर जळगाव ते दिल्ली ( राष्ट्रपति भवन ) अशी संविधान साक्षर सायकल रॅली प्रारंभ केली असून हि बाब या देशातील तरुणांना प्रेरणा देणारी आहे असे विचार प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

- Advertisement -

जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्या पासून सदर रैली निघाली असता उपस्थित जनतेस मार्गदर्शन करताना वाघ बोलत होते . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज बहुतांश युवक हे मोबाइलवेडे झाले असून काही युवक भरकटल्यागत वागत आहेत आज देशात कधी नव्हे एवढी भयानकता वाढली असल्याने जबाबदार नागरिक होणे गरजेचे आहे हे काम मुकेश कुरील संविधान जागरच्या माध्यमातून करीत आहेत . जयसिंग वाघ यांनी विविध उदाहरणे देवून आपले विचार मांडले .
मुकेश कुरील यांनी त्यांच्या तीन वर्षापासुनचे अनुभव मांडून संविधान प्रत्येक व्यक्तिने अभ्यासले पाहिजे असे मत मांडले .
जनक्रांति मोर्चा चे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी या प्रसंगी मुकेश कुरील यांच्या एकूण कार्याची माहिती विषद करुन त्यांचा आदर्श आजच्या तरुण पीढ़ीने जरूर घ्यावा , जनतेने संविधान समजून घेवून आपल्या अधिकारा करीता रस्त्यावर यावे असे आवाहन केले . त्यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या .

या प्रसंगी डॉ. मिलिंद बागुल , डॉ. सत्यजित साळवे , संदीप ढंढोरे , हेमंत बिरहाडे , जीवन सोनवणे , नीलेश इंगळे , दिलीप सपकाळे , रमेश सोनवणे , नीलेश बोरा , सचिन भोई , गौरव सोनवणे ई. कार्यकर्ते हजर होते .सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले अखेरिस मुकेश कुरील यांचा विविध लोकांनि फुलहार देवून सत्कार करीत शुभेच्छा दिल्या .

Constitution lite cycle rally

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS