NCP; यावल भुसावळ रस्त्यालगत असलेल्या गटारी बांधकाम व काँक्रीट करण्याचे चौकशी करावी – राष्ट्रवादी काँग्रेस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – येथील अत्यंत वाहनांच्या वर्दळीच्या यावल भुसावळ मार्गावर सद्या काँक्रीटीकरणाचा रस्ता व गटारीच्या बांधकाम सुरू असुन या कामावर संबंधीत ठेकेदार करून निविदा अटींचा भंग करून माती मिश्रीत वाळु आणी कमी प्रमाणात सिमेंट वापरण्यात येत असुन सदरच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरी या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे .

- Advertisement -

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील अवजड वाहनांसह दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या यावल ते भुसावळ मार्गावरील जुना भुसावळ नाक्यापासुन तर नाल्या पर्यंतच्या गटारी बांधकाम व रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे सदरच्या या कामावर काम करणाऱ्या ठेकेदाराकडून शासकीय निविदा व अटीशर्ती धाब्यावर ठेवुन अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट व नाल्याची माती मिश्रीत वाळुचा वापर करण्यात येवु सदरचा निकृष्ठ प्रतिचा बनविता जात आहे .

सदरच्या या मार्गावर नेहमीच परप्रांतातुन येणारी अवजड वाहनासह ईतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीचा असुन वाहतुकीची मोठी वर्दळ या मार्गावरील रस्त्यावरअसते त्यामुळे निकृष्ठ प्रतिचे साहित्य वापरून तयार होणारा हा काँक्रीटचा रस्ता फार काळ टिकणार नाही . त्याच प्रमाणे संबधीत ठेकेदाराकडुन सदरचे काम हे कासवगतीने करण्यात असल्याने भुसावळकडे जाणाऱ्या ईतर वाहनांचा मार्ग हा दुसरीकडे वळविण्यात आल्याने वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सोसावे लागत असुन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी संबधीत विभागाने सदरील या कामाची त्वरीत या कामाची चौकशी करून शासकीय नियम धाब्यावर ठेवुन काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी, कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तिव्रआंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा दिला असुन प्रसंगी न्यायालयात देखील दाद मागण्यात येईल असे ही प्रा मुकेश येवले यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

 NCP

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS