साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | गेल्या दोन दिवसापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. केंद्र सरकारने कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी निर्यात दरात वाढ केलीय. निर्यात मूल्य वाढवल्याचा परिणाम कांद्याच्या किंमतीवर झाला असून आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसात सरासरी दरात क्विंटल मागे ४७५ रुपयांची घसरण झाली आहे.
केंद्र सरकारने निर्यात मुल्यात वाढ केली आहे. याआधी निर्यात मूल्य ४०० डॉलर इतके होते. ते वाढवून आता ८०० डॉलर इतके करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 5300 रुपये इतका भाव मिळत होता त्याच कांद्याला 4800 रुपये भाव मिळाला आहे. तिकडे केंद्र शासनाने कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यात मुल्यात वाढ केलीय. कांद्याच्या दरात घसरण सुरु झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले तर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने म्हटलं की, दोन महिन्यापासून कमी किंमतीत कांद्याची विक्री केली. आता थोडी भाववाढ झाली. कांद्याचे भाव जास्त वाढत नाहीत. पण शेतकऱ्यांना पैसे मिळत रहावेत, आता कांद्याचे भाव कमी होऊ नयेत इतकीच केंद्र सरकारकडे विनंती आहे.