ऐनपूर ( साक्षीदार न्युज ) : – सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील मराठी व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील मराठी भाषा विषयाचे प्रा. डॉ एम के सोनवणे यांनी केले. अब्दुल कलाम सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेले असून त्यांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वनस्पती शास्त्र विभागातील प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचन संस्कृती’ तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या पासून आपण प्रेरणा घेऊन वाचनाचे किती महत्त्व आहे हे आपल्या भाषणातून विशद केले. त्यांनी विविध प्रकारची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी वाचन का करावे ? वाचनाचे महत्त्व काय आहे ? तसेच विविध मान्यवरांनी आपल्या जीवनात वाचनाच्या सवयीमुळे उच्च पदस्थ झालेले आहेत अशी विविध उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्याचबरोबर विविध प्रकारची वाचन प्रकार त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा. क्रमिक पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाची पुस्तके वाचली पाहिजेत असे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस एस साळुंखे यांनी मानले तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा ग्रंथालयात विविध प्रकारची वाचन साहित्य उपलब्ध असून अवांतर वाचनाची विशेष दालन महाविद्यालयात असून ग्रंथालयाचा आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रेखा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ जे बी अंजने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील विभाग प्रमुख प्रा. डॉ रेखा पाटील, प्रा. डॉ. एम. के. सोनवणे ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. एस एस साळुंके, प्रा. व्ही एच पाटील , डॉ. एस ए पाटील, प्रा. अक्षय महाजन, प्रा. नरेंद्र मुळे, डॉ. पी आर गवळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही एन रामटेके, शिक्षकेतर कर्मचारी श्री हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.