साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तें यांच्या गाडीची काही अनोळखी इसमांनी तोडफोड केल्यावर याच आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते आमदार आहे संजय गायकवाड.
संजय गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवालं गेलं. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसंकाय मराठा आरक्षणामुळे यांचं फार मोठं नुकसान होणार आहे.
त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतं.” “गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झालं. सदावर्तेंची चांगली व्यवस्था करायला हवी होती,” असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.