साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ जळगाव शहरात अनेक परिसरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेकानी जल्लोषात स्वागत मिरवणूक काढली. याच स्वागत मिरवणुकीमध्ये नाचत असताना वाद होऊन आनंद श्रीकृष्ण जंजाळे ऊर्फ नाव नाय (२६, रा. विवेक कॉलनी) यांना दोन जणांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री संभाजी चौकात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी चौकात रविवारी रात्री आनंद जंजाळे हे दुर्गा देवी मिरवणुकीत नाचत असताना एकाने मुद्दाम धक्काबुक्की केली. त्यावर दोघांमध्ये वाद झाला. थकल्याने जंजाळे हे एका दुकानाजवळ बसले होते. तेथे दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
- Advertisement -