कापूस उत्पादक शेतकरी संकटात : सुरु झाला बोंड अळीचा प्रादुर्भाव 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसापासून अनेक भागातील शेतकरी चिंतेत आहे तर काही शेतकरी सुखावले आहे पण सध्या कापूस उत्पादक शेतकरी संकटात आले आहे. आता बागायत कपाशीचे बोन्ड फुटले असून वेचणीला देखील सुरवात झाली आहे. परंतु कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उत्पदक शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यात कपाशीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असते. परंतु सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागली आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सुरवातीलाच बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

अमरावती जिल्ह्यातील निंबोरा बोडखा येथील नामदेव वैद्य या शेतकऱ्यांनी १७ एकरावरती कपाशीची लागवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांना कपाशीचे उत्पादन कमी होणार असल्याने चिंता सतावते आहे. दुसरीकडे सध्या स्थितीत जर बाजार भाव कपाशीचा बघितला तर ७ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS