साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात मागील वर्षाचा कापूस जसाचा तसा पडला असल्याने अनेक शेतकरी टेन्शनमध्ये आले आहे पण यंदाच्या नवीन कापसाची वेचणी सुरु झाली असून शेतकरी कापूस खरेदीसाठी काढत आहे. तर काही ठिकाणी दिवाळी पाडव्यापासून कापूस खरेदीला सुरवात केली जात असेल. त्यानुसार कापूस विक्री केल्यानंतर २४ तासाच्या आत शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे.
परभणीच्या मानवत बाजार समितीत यंदाच्या कापूस हंगामातील बाजार समितीच्या कापूस खरेदी सुरू करण्यासाठी मुहूर्त लागला आहे. मानवत बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १४ नोव्हेंबरपासून कापूस लिलाव सुरू होणार आहेत. यार्डात कापूस लिलाव करताच शेतकऱ्यांना पुढील २४ तासात संबंधित जिनिंग व्यापाऱ्याकडून विक्री केलेल्या कापसाची रक्कम द्यावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जिनींगमध्ये कापूस विक्री केल्यानंतर संबंधितांकडून शेतकर्याला रक्कम देणे अनिवार्य आहे. मात्र शेतकऱ्यांना रक्कम न मिळाल्यास सात दिवसांच्या आत बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे.