साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने स्टंट करणारा तरुण चांगलाच अडणीत आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक तरुण सुरुवातीला बाईकच्या समोरील हेडलाईटच्या भागात काही फटाके लावताना दिसतोय, त्यानंतर दुसरा तरुण येऊन बाईकवर बसतो. बाईकवर बसल्यानंतर हिरव्या रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने फटाक्यांच्या वाती पेटवल्या. यानंतर हेल्मेट घातलेला तरुण येतो आणि बाईक जोरात चालवू लागतो. यात तो बाईकवरून स्टंटही करत आहे. स्टंट करताना बाईकला लावलेले फटाके एकापोठापाठ फूटत आहेत
सदर व्हिडीओ हा@Lollubee या एक्स (ट्वीटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ तमिळनाडूमधील त्रिची जिल्ह्यातील आहे. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
எவனோ ஒருத்தன் ஆரம்பிச்சி வச்சான், இப்ப நிறைய பேரு இதே மாதிரி பைக்ல வெடி கட்டி வீடியோ போட ஆரம்பிச்சிட்டானுக. pic.twitter.com/cpofhXjV6W
— 𝗟 𝗼 𝗹 𝗹 𝘂 𝗯 𝗲 𝗲 (@Lollubee) November 12, 2023
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे धोकादायकरित्या फटाके वाजवून इतरांना त्रास देवू नका अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. तर या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याचीही मागणी काही जणांनी केली आहे.दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीसही या तरुणांचा शोध घेत आहेत