Jalgaon Crime | एमआयडीसी पोलिसांनी तीनच दिवसांत आरोपीला गजाआड करत 4.5 लाखांची कार हस्तगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Crime साक्षीदार न्यूज | |सुनिल भोळे | जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरातून चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कार एमआयडीसी पोलिसांनी केवळ तीन दिवसांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून चोरी गेलेले वाहन जप्त केले असून सुमारे ४.५ लाख रुपये किमतीची ही कार परत मिळाल्याने फिर्यादींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या घरासमोर कार पार्क केली होती. मात्र, पुढील दिवशी सकाळी कार बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला. वाहनाचा काहीच मागोवा न लागल्याने अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची खात्री पटली. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५७/२०२५ भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुप्त माहिती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तपासात आरोपीची हालचाल स्पष्ट झाल्यानंतर नवनाथ नगर परिसरात सापळा रचून २३ नोव्हेंबर रोजी विनय मनोहर जाधव (रा. नवनाथ नगर, जळगाव) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने कार छत्रपती संभाजीनगर येथे नेल्याची कबुली दिली.

- Advertisement -

आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथे धाड टाकत अंदाजे ४,५०,000 रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली. वाहन सुरक्षित स्थितीत सापडले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कामगिरी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पार पाडली. पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह. प्रदीप चौधरी, पोह. रमेश चौधरी, पोह. प्रमोद लाडवंजारी, पोह. किरण चौधरी, पोह. गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, पोकॉ नितीन ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठे, पोकॉ नरेंद्र मोरे आदींचा समावेश होता.

संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Jalgaon Crime

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS