back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Criminal ; आसराबारी वनक्षेत्रावरील राहणाऱ्या परप्रांतीयांना बनावट दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : आदिवासी तडवी भिल्ल संघटनेची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Criminal

यावल ( प्रतिनिधी ) ; – सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या खऱ्या आदिवासींवर अन्याय करीत स्थानिक आदीवासी बांधवांना डावलुन आर्थिक स्वार्थाला बळी पडून परप्रांतीय लोकांना ५o वर्षापासुन राहात असल्याचे खोटे व बनावट रहिवासी दाखले देणाऱ्या वड्री ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवक आणी पदाधिकारी यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे . अशी मागणी आदिवासी तडवी भिल्ल एकता या संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

- Advertisement -

या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच ,महाराष्ट्र या संघटनेने म्हटले आहे की , वड्री तालुका यावल या ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक जी एस तिडके व स्थानिक पदाधिकारी आणि संबधीत अधिकारी यांनी संगनमताने आसराबारी नावाच्या एका ठिकाणी काही वर्षापासुन परप्रांतातुन आलेल्या लोकांना दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत शासनाची दिशाभुल करीत आदीवासी बांधवांना अंधारात ठेवुन गावालगत असलेल्या आसराबारी या ठीकाणी परप्रांतीय मंडळी ५० वर्षापासुन राहत असल्याचा खोटा ठराव करून परप्रांतीयांचे आर्थिक व्यवहार करून बोगस सामृहीक वन हक्क दावा आणणारा ठराव मंजुर करून घेतला असुन , वड्री ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक जी एस तिडके यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमताने सदर ही परप्रांतीय मंडळींचा ५० वर्षापासुन राहात असल्याचा कोणताही पुरावा नसतांना तसेच या परप्रांतीयांचा या गावाशी कोणताही भौगोलिक सामाजीक व सांस्कृतीक सबंध नसतांना तसेच या मंडळीचे महसुल दफ्तरी कोणतेही महसुली पुरावे नसतांना सदरच्या परप्रांतीय मंडळीकडून पैसे उकडून दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत स्थानिक ग्रामस्थांसमोर कोणत्याही विषयावर चर्चा न करता खोटा ठराव घेत मौजे आसराबारी येथील रहिवासी अनु .जमातीच्या जातीचे लोक व इतर पारंपारीक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ व विषय व ईतर सुधारीत विषय २०१२ अतंर्गत सामुहीक वन हक्क मिळणे बाबतचा ठराव मध्ये नमूद आसराबारी येथे अनुसूचित जमातीचे लोक हे जवळपास ५० वर्षापासुन राहतात.

सदरची वस्ती ही वन विभागाअंतर्गत येणाऱ्या कम्पामेंट क्रमांक ८२ च्या भागात वस्ती करून राहात आहे . असा खोटा ठराव करून व बनावट दाखला देत वनविभाग , प्रांत अधिकारी कार्यालय फैजपुर यांचेकडे आर्थिक व्यवहार करून सामुहिक वनहक्क दावा दाखल केलेला आहे . वड्री ग्रामपंचायत व्दारे घेण्यात आलेल्या सदरच्या या बोगस व खोटया ठरावामुळे स्थानिक आदिवासींच्या हक्कावर गदा येणार असुन , या बनावट ठरावाचे समाजावर दूरगामी परिणाम होणार आहे . तरी प्रशासनाने तात्काळ वड्री ग्रामपंचायती ने दिलेले बोगस राखले रद्द करीत या सर्व आर्थीक स्वार्थासाठी झालेल्या गोंधळास जबाबदार असलेले तत्कालीन ग्रामसेवक जी एस तिडके यांच्यासह सबंधित अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायदा १९८९ नुसार गुन्हे दाखल करावीत अशी मागणी केली असुन , सदरची मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा ईशारा आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच ,च्या वतीने देण्यात आला असुन , या निवेदनावर अकलम फकीरा तडवी , फिरोज कलंदर तडवी , रबील तडवी , सलमान तडवी, नशिर राशिद तडवी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS