दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला दुसऱ्यांदा हद्दपार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उपविभागीय अधिकारी यांनी काढले आदेश

- Advertisement -

जळगाव ; – सुप्रिम कॉलनीत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला सात वर्षांपुर्वी जिल्हाप्रशासनाने हद्दपार केले होते. आता पुन्हा त्याने परिसरात दहशत निर्माण केल्यावरून उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश शनिवारी काढले आहे. आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक, सुप्रीम कॉलनी) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत असल्याने त्याच्यावर २०१४ पासून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दुखापत करणे व इतर वेगवेगळे आठ गुन्हे दाखल आहे. त्याची दहशत पाहता त्याला २०१६ मध्ये एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

- Advertisement -

हद्दपारीच्या प्रस्तावाची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, निलोफर सैयद, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांनी केली.

Criminal Terror 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS