साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | राज्यात थंडीची चाहूल सुरु असतांना तापमानाचा पारा घसरला असून खरीप हंगामातील पीके काढणीला आल्याने शेतकऱ्याने शेतीकामांना वेग दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी खरीप हंगामातील पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली. मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. आज म्हणजेच बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऐन खरीप हंगामातील पीके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.