Crop Insurance ; केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची रक्कम तात्काळ देण्यात यावी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Crop Insurance ; साक्षीदार न्युज ; – वादळी वाऱ्यामुळे तसेच हवामानावर आधारीत केळी पिकाच्या नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना लवकरात देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भाजपा जळगांव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक जळगांव तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले.

- Advertisement -

निवेदनात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे तसेच गारपिटी मुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले होते. नियमा नुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानी बाबत तक्रार करणे क्रमप्राप्त असते तसेच शेतकऱ्याची नुकसानीची तक्रार सूचना दिल्यानंतर विमा कंपनीने सुद्धा ५ ते ७ दिवसांच्या मुदतीत पंचनामे पूर्ण करावेत. परंतु बऱ्याचदा विमा कंपनी २० ते २५ दिवस झाल्यावर सुद्धा पंचनामे पूर्ण करत नाही. जास्त दिवस झाल्यावर व पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला नुकसानग्रस्त पीक शेतात ठेवता येत नाही त्यामुळे नुकसानीचे योग्य आकलन होत नाही. त्यामूळे शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत जी माहिती अपलोड केलेली आहे ती माहिती ग्राह्य धरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला द्यावेत अशी मागणी केली आहे.

तसेच अनेक वेळा वादळी वाऱ्यामुळे किंवा गारपिटीमुळे केळी पिक पूर्णतः पडत नाही पण केळीचे पाने पूर्ण फाटून जातात. केळी पिकाचे मुख्य अन्नप्रक्रिया होण्यासाठी केळीचे पाने चांगली असणे आवश्यक असते म्हणून वादळी वाऱ्यामुळे पूर्णतः केळीचे पाने फाटलेली असतील तरी नुकसानग्रस्त ग्राह्य धरण्यात यावे असेही निवेदनात नमूद केले आहे.
हवामानावर आधारित केळी फळ पिक विमा योजना सन २०२३-२४ मधील विमा प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या १०६१९ शेतकऱ्यांपैकी आपण ६८८६ विमा प्रस्ताव ग्राह्य धरून नुकसान भरपाई बाबत आदेश दिलेले होते.
तरी सदर परिस्थिती बघता सर्वच नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी मागणी केली आहे.

Crop Insurance

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS