साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ ; राज्यातील अनेक भागात गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याच्या घटना नियमित घडत असतांना आता या घटना खानदेशमध्ये देखील उघडकीस येवू लागल्या आहे. नुकतेच शेतात पिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याच प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना शिरपूर तालुक्यात घडली असून कापूस व तुरीच्या पिकात लागवड केलेली गांज्याची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे.
शिरपूर तालुक्यामध्ये गांज्याच्या दोन वेगवेगळ्या कारवाया पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. एका कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कापूस व तूरच्या शेतीच्या आडून होत असलेली गांज्याची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केली आहे. यामध्ये जवळपास ५६ लाख रुपयांचा गांज्या पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईदरम्यान एक आरोपी देखील निष्पन्न झाला असून त्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे सुरू आहे.