back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Cyber ​​Attack On Sunil Mantri | सुनील मंत्री यांच्याकडे सायबर हल्ला, इंदू कॉम्प्युटर्स संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cyber ​​Attack On Sunil Mantri साक्षीदार न्युज | १५ जुलै २०२४ | जळगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक सुनील आर. मंत्री यांच्या कार्यालयात सायबर हल्ला झाला असून त्यामुळे सर्व डेटा हॅक होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सायबर सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर नूतनीकरणकामी पैसे देऊन देखील ते न केल्याने हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनील आर. मंत्री या संस्थेच्यावतीने दीपक वडनेरे, संचालक – इंदू कॉम्प्युटर्स, जळगाव यांच्या विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

- Advertisement -

व्ही डी पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

शेततळे च्या नावाखाली ४५ लाखाची फसवणूक

 

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील आर. मंत्री ही संस्था ऑटोमोबाईल, मोबाईल, सरकारी कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, मालमत्ता भाडेकरार, वैद्यकीय सेवा, वेअरहाऊसिंग असा व्यवसाय करीत असतात. संस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव स्थित मेहरुण शिवार गट नं. 78, प्लॉट नं. 1 एमआयडीसी येथे आहे. या मुख्य कार्यालयातील संगणकाचे देखभाल-दुरुस्ती इत्यादीची कामे दीपक वडनेरे यांची संस्था इंदू कॉम्प्युटर्स जळगाव हे करीत असतात.

संस्थेतील सर्व संगणकमध्ये ‘सोफोस सपोर्ट’ या कंपनीची फायरवॉल ही लावण्याकरिता तीन वर्षाची रक्कम दि.२ जून २०२४ रोजी रुपये ८९ हजार १३५ रुपये दीपक वडनेरे यांना दि.५ जून रोजी देण्यात आले होते. मात्र, त्यांनी फायरवॉलचे रिन्युअल अर्थात नूतनीकरण न केल्यामुळे व सुरक्षा न मिळाल्यामुळे सुनील आर. मंत्री यांच्या मुख्य कार्यालयातील संगणक प्रणालीवर सायबर अटॅक होऊन सर्व डेटा हॅक होऊन नुकसान झालेले आहे.

दि.२१ जून २०२४ पर्यंत असलेली मुदत आणि १५ दिवस अगोदर दिलेली रक्कम, नूतनीकरण न झाल्यामुळे हा सायबर हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. यासंदर्भात दीपक वडनेरे, संचालक – इंदू कॉम्प्युटर्स, जळगाव यांच्याविरुद्ध यश सुनील मंत्री यांनी तक्रार दाखल केलेली असून हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे तपास करीत आहेत.

Cyber ​​Attack On Sunil Mantri

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS