Cyber security साक्षीदार न्युज । अमळनेर । सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने “सायबर साथी” या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन होमगार्ड जवानांसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी उपस्थित राहून सायबर सुरक्षेच्या विविध बाबतीत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सायबर फसवणूक, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, सोशल मीडियावर होणारे गुन्हे, फिशिंग, OTP फसवणूक अशा अनेक प्रकारांबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच अशा घटनांपासून कसे सावध राहावे, याचे मार्गही सांगितले.
हा उपक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विनायक कोते आणि परिविक्षाधीन पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांच्या आदेशानुसार राबविण्यात आला. यामध्ये अनेक होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला व सायबर सुरक्षेबाबतची मौल्यवान माहिती प्राप्त केली.
कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा विषयक माहिती पोहोचवणे आणि संभाव्य फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे हा होता. या उपक्रमामुळे सहभागी होमगार्ड जवानांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली आहे.
आईनेच स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवला
शिक्षण विभागात 570 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश, 200 कोटींचा घोटाळा
सासूला पळवून नेणाऱ्या जावयाचा सासऱ्याला निरोप: “२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा”
फ्लॅटच्या मेंटेनन्सवर 18% जीएसटीचा बोजा; ₹7500 पेक्षा जास्त खर्च असेल तरच कर लागू