यावल( जीवन चौधरी ) ; – तालुक्यातील दहिगाव येथील देवी मंडळाच्या आरासला मध्य धुंद दारुड्यांनी पेटवून नुकसान केले व विटंबना केल्याप्रकरणी यावल पोलिसात दोन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार गावातील अवैध धंद्यांचे दुष्परिणाम होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे जात आहे.
आज दिनांक 2१ ऑक्टोबरच्या रात्री ऑक्टोबरच्या रात्री साडेबारा ते एक वाजे ते दरम्यान गावातील साई दुर्गा मंडळाच्या वैभव रवींद्र पाटील पंकज संतोष पाटील पाटील या दोघांनी मोटरसायकलवर येऊन देवीला लावलेल्या भगव्या परद्यांना आग लावली हे त्वरित बाजूस बसलेल्या तरुणांनी पाहिल्याने त्याचा पाठलाग केला व तत्काळ आग विझवली यात देवीचाघट कळस पेटून बाजूला लावलेले कापड जळाला आहे मध्य धुंद वैभव आणि पंकज पंकज यांनी याच रात्री या मंडळाजवळ त्यांनी त्रास दिल्या प्रकरणी महिलांनी चोप दिला होता तरीदेखील त्यांनी महिलांचा गर्भा खेळ संपल्यानंतर रात्री साडेबारा ते एक वाजेचे दरम्यान येऊन देवीच्या आरासला पेटविले त्यांना पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजता ताब्यात घेतले आहे हा प्रकार गावात प्रमुख चौकात शाळा व धार्मिक स्थळांच्या आवारात धार्मिक स्थळांच्या आवारात खुलेआम दारू विक्री अवैध धंदे जोमाने सुरू असल्याने होत असल्याचे स्पष्ट होत आहे.दारुड्यांची संख्या गावात दिवसेंदिवस वाढत आहे आणि हेच दारुडे शांततेचा भंग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत पोलिसांनी नऊ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी भेट देऊन दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे व गावात शांतता राहावी यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे पोलीस उपनिरीक्षक गोसावी हेड कॉन्स्टेबल तायडे व होमगार्ड बंदोबस्तासाठी आहेत. याबाबत यावल पोलिसात किशोर जयराम पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमुख चौकातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होत असताना देखील खुलेआम दारू विक्री होत आहे विशेषतः ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या संकुलनात व सार्वजनिक जागेवर अवैध धंदे जोरात सुरू असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.