मंदिरातील दानपेटी चोराला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

चाळीसगाव ;– तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील शाकांभरी देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड तालुक्यातील सीतामाई तांडा येथील तरुणास हर्सल जेलमधून ताब्यात घेतले.

- Advertisement -

त्याने मंदिरातील दानपेटी चोरीची कबुली दिली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे २ हजार रुपये रकमेची चोरी अज्ञात चोरट्याने केली होती. दानपेटी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपीचे नाव परमेश्वर टिका (आळे) राठोड (वय ३०, सीतामाई तांडा, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.

संशयित आरोपी हा हर्सल कारागृहात असल्याने हवालदार संदीप पाटील, विजय शिंदे, जयेश पवार, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांच्या पथकाने हर्सल जेलमधून परमेश्वर राठोड यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्याची अधिक चौकशी सध्या चाळीसगावचे पोलिस करत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS