Indurikar Maharaj | मोठी बातमी: लेकीच्या साखरपुड्यानंतर टीकांना कंटाळून महाराजांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘आता खूप झालं…’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Indurikar Maharaj | साक्षीदार न्यूज | प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या किर्तनापेक्षा लेकीच्या एका समारंभामुळे जास्त चर्चेत आहेत. नुकताच त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. मात्र, या समारंभानंतर महाराजांवर मोठी टीका होत आहे.

- Advertisement -

शाही साखरपुड्यामुळे महाराजांवर टीकांचा भडिमार

संगमनेर येथील एका लॉन्समध्ये इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला. या समारंभाला जवळपास २,००० लोकांची उपस्थिती होती.

  • शाही पद्धतीने मंगल कार्यालयात प्रवेश करणारी महाराजांची कन्या,
  • मोठ्या गाड्यांचा ताफा,
  • आणि या सोहळ्यातील ‘शाही थाट’

याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायातील काही लोकांनी आणि समाज माध्यमांतील युजर्सनी त्यांच्यावर टीका केली. किर्तनांमध्ये साधेपणाने लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराज, स्वतःच्या लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले, असा आक्षेप घेण्यात आला.

- Advertisement -

“आता फेटा खाली ठेवतो!” – महाराजांचे मोठे विधान

लेकीच्या साखरपुड्यानंतर सततच्या टीकांना कंटाळून अखेर इंदुरीकर महाराजांनी यावर थेट भाष्य केले आहे. त्यांनी केवळ नाराजी व्यक्त केली नाही, तर एक अत्यंत मोठे विधान करत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.नारजगी व्यक्त करताना महाराज म्हणाले,

“आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत.”

सततच्या टीकेमुळे ते व्यथित झाले असून, ‘आता सहन करण्यापलीकडे गेले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

इंदुरीकर महाराजांनी थेट संकेत दिले की,

“मी गेल्या तीस वर्षांपासून फक्त टीकाच सहन करत आलो आहे. मात्र, विषय आता माझ्या कुटुंबापर्यंत आला आहे. माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक होती, पण कुटुंबापर्यंत गेले आहे आणि हे अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे.”

या विधानातून त्यांनी किर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. म्हणजेच, वाढत्या आणि वैयक्तिक टीकेमुळे महाराज किर्तनातून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात पुढील काही दिवसांमध्ये एक व्हिडीओ तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

8th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘गूड न्यूज’! ८ व्या वेतन आयोगाचे ७ महत्त्वपूर्ण अपडेट्स आले समोर
LIC Jeevan Tarun | फक्त ₹१५० दररोज गुंतवा आणि मुलाच्या भविष्यासाठी २६ लाख मिळवा!
Dharmendra Discharged | मोठी बातमी: अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर, पण ‘मृत्यूच्या अफवांनी’ कुटुंब संतापले!

 

Indurikar Maharaj

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS