Ladaki Bahin PM Kisan ; लाडकी बहीण ते पीएम किसानसह खात्यात 6100 रुपये येणार ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Ladaki Bahin PM Kisan साक्षीदार न्युज ; – अनके योजनांचा लाभ हा नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळत आहे . केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6 वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात 6100 रुपये मिळू शकतात.

- Advertisement -

6100 रुपये मिळणार पण ?
केंद्र सरकारमार्फत देशातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यात एका वर्षामध्ये एकुण 6 हजार रुपये दिले जात आहे . आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता देखील शेतकऱयांना मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळू शकतात. याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती, त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना या योजनेचा ६ वा हप्ता मिळाला तर ते देखील 2000 रुपये मिळतील असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला 4 हजार रुपये मिळणार आहेत . याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणं 1500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ केल्यास 2100 रुपये मिळतील, असे एकूण 6100 रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला 6100 रुपये मिळू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार?
महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात. महायुतीनं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्क्म वाढवण्याचं आश्वासन देखील देण्यात आले होते . ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये द्यावे लागणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या योजनांशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी 10 हजार रुपये दिले जातात.

Ladaki Bahin PM Kisan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS