गोजोरा येथे बेदम मारहाण करून तरूणाचा खून; शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी केला अक्रोश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे २७ वर्षीय तरूणाला अज्ञात कारणावरून शेतात बोलावून ३ ते ४ जणांनी बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विनोद गंभीर कोळी (वय २७, रा. गोजोरा, ता. भुसावळ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

विनोद कोळी हा तरूण आपल्या आई, वडील आणि दोन भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपी जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती. आज शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता विनोदला एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपडू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले.

शेतात संशयित श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी विनोदला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला सुरूवातीला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. प्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Government Hospital

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS