विजेच्या धक्क्याने अल्पवयीन कामगार मुलाचा दुदैवी मृत्यू ४ जण थोडक्यात बचावले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरच्या ठिकाणी गाळ काढत असतांना क्रेनमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का लागल्याने एका १६ वर्षीय अल्पवयीन कामगार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. तर इतर ४ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सखाराम जिना बारेला वय-१७ रा. गंगापूर ता.जामनेर असे मयत झालेल्या अल्पवयीन कामगार मुलाचे नाव आहे.

- Advertisement -

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ भुसावळ रेल्वे विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पावरा समाज बांधव हे काम करत असतात. याच पद्धतीने भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर जवळ असलेल्या टाकीमधून गाळ क्रेनच्या सहाय्याने करत होते. यावेळी क्रेनमध्ये विद्यूत प्रवाह उतरलेला होता. यावेळी गाळ काढत असतांना सखाराम हिना बारेला याला जोरदार विजेचा झटका बसला, त्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला, शिवाय सोबत असलेले इतर चार कामगार हे किरकोळ जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले आहे. ही घटना शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सुमारास घडली आहे. सखाराम बारेला व काही समाजबांधव हे गेल्या एक महिनाभरापासून तिथे काम करत आहे. दरम्यान या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Electric Shock

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS