जुन्यावादातून मारहाण केल्याने वृध्दाचा मृत्यू – शिंदी ते मोंढाळे गावादरम्यानच्या शेतातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – भुसावळ तालुक्यातील शिंदी ते मोंढाळे गावाच्या दरम्यान असलेल्या शेताजवळ जुन्या वादातून एकाने दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव राजाराम डहाके (वय-७५, रा. पिशोर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे मयत वृद्धाचे नाव आहे.

- Advertisement -

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सदाशिव डहाके हे वृद्ध व्यक्ती भुसावळ तालुक्यातील मोंढाळे येथील अनिल संतोष धनगर यांच्या शेतातील गोठयात कामाला होते. दरम्यान जुन्या वादातून लक्ष्मण गणेश शिराळे रा. शेलवड ता. बोदवड याने बुधवार १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाटीवर झोपलेल्या सदाशिव राजाराम डहाके या वृद्धाला दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवेठार मानाची धमकी दिली. त्यामुळे जखमी झालेल्या वृद्धाचा झोपलेल्या स्थितीत काटेवरच मृत्यू झाला. हे घटना घडल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून मृतदेह भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. या घटनेप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गणेश शिराळे रा.शेलवड ता. बोदवड यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहे.

Old Man

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS