back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Debt On India : भारतावरील कर्जाचा डोंगर वाढला! देशाचे एकूण कर्ज झाले 205 लाख कोटी रुपये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Debt On India : आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तीन महिन्यात एकूण कर्ज 200 लाख कोटी रुपये होते.
नवी दिल्ली. भारतावर कर्जाचा डोंगर हा वाढतच जात आहे . भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, परंतु देशावरील कर्जाचा डोंगरहितवाद्यांचा वेगाने वाढत जात आहे . चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज 205 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या काळात डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याचा परिणामही दिसून आला आहे .

- Advertisement -

गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत एकूण कर्ज 200 लाख कोटी रुपये होते. IndiaBonds.com चे सह-संस्थापक विशाल गोयंका यांनी RBI डेटाच्या आधारे केंद्र आणि राज्यांच्या कर्जाच्या बोजाची आकडेवारी जाहीर केली आहे.

सप्टेंबर तिमाहीत केंद्र सरकारचे कर्ज 161.1 लाख कोटी रुपये झाले. मार्च तिमाहीत हे कर्ज 150.4 लाख कोटी रुपये होते. राज्य सरकारांचा एकूण कर्ज वाटा 50.18 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च २०२३ मध्ये डॉलर ८२.५४४१ रुपये होता. तो आता 83.152506 रुपये झाला आहे.

- Advertisement -

हा अहवाल आरबीआय, सीसी आणि सेबी डेटावरून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रावरील कर्जाचा बोजा एकूण कर्जाच्या 46.04 टक्के आहे, तर राज्यांचा कर्जाचा बोजा 24.4 टक्के आहे.

या कर्जाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताला इशारा दिला आहे. आयएमएफने म्हटले आहे की हे सरकारी कर्ज मध्यम कालावधीत जीडीपीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे दीर्घकाळात कर्जाची परतफेड करण्यात अडचण येऊ शकते, असे सांगण्यात आले. यावर केंद्र सरकारने असहमती दर्शवली आणि सांगितले की, सरकारी कर्जाचा धोका खूपच कमी आहे, कारण बहुतांश कर्ज रुपयांमध्ये आहे.

Debt On India 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS