साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. यात अनेकांचा विजय तर पराभव देखील झाला आहे. अशाच एका पराभूत झालेल्या उमेदवाराने एका महिलेला धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
जळगाव तालुक्यातील तालुक्यातील आमोदा बु. च्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराने एका महिलेला ‘तुझ्यामुळे पराभव झाला, तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्या पतीचाही घात केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमोदा बु. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विनोद रघुनाथ सुर्यवंशी (वय ३८) याचा पराभव झाला. या पराभवाच्या रागातून बुधवारी सकाळी विनोद सूर्यवंशी याने कल्पना सुभाष सूर्यवंशी (वय ५६) या महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनोद सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.